

श्री सत्यसाई बहुद्देशीय संस्था
श्री सत्यसाई बहुद्देशीय संस्था ही एक सामाजिक विकासाकरिता काम करणारी संस्था आहे. देणगी आणि सेवा अशा लोकसहभागातून ही संस्था आपले कार्य करीत आहे. २०१६ साली या संस्थेची स्थापना झाली. वृद्धाश्रम, गौशाला, छात्रावास आणि शाळा हे चार प्रकल्प म्हणजे संस्थेचे चार स्तंभ आहेत व वैद्यकीय सेवा केंद्र, हे यावरील छत्र आहे.
सध्या साई सावली वृद्धाश्रम तसेच गौसाई ही गोशाळा अशा दोन प्रकल्पांचे संचालन आणि नियोजन आम्ही यशस्वीपणे करीत आहोत.
‘सामाजिक सेवामहे’ हे ब्रीदवाक्य उच्चारून समाजातील तळागळातील घटकांच्या उत्थानाकरिता संस्था आणि संस्थेच्या माध्यमाने आम्ही कार्यकर्ते हे समाजाप्रति असलेल्या आपल्या दायित्वाची जाणीव ठेवून आहोत. आमच्या या कार्यात आपला सहभाग किंवा देणगीरूपी योगदान प्राप्त व्हावे ही नम्र अपेक्षा आहे.
संस्थेचे व्हिजन
समाजातील तळागळातील व्यक्तींना उत्तम आरोग्य व जीवन लाभावे या करिता श्री सत्यसाई बहुद्देशीय संस्था तत्पर आहे. या दिशेने ही संस्था सेवा, सुश्रुषा, व सहजीवन यासाठी कार्यरत असेल आणि एक सुदृढ समाज घडविण्यासाठी व्रतस्थ असेल.
संस्थेचे मिशन
सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, युवा, कृषी आणि धर्मार्थ या क्षेत्रात धर्मदाय माध्यमाने आणि लोकसहभागातून वृद्धाश्रम, गौशाला, छात्रावास, रुग्णालय, आणि शाळा,असे विविध प्रकल्प उभारून त्याद्वारे विविध उपक्रम घेऊन संस्थेचे उद्देश्य गाठण्यासाठी झटणे व समाज आणि संस्था यांच्याशी प्रामाणिक राहून सेवाभावाने कार्य करून सामाजिक उन्नती घडवून आणणे हे संस्थेचे मिशन आहे.
संस्थेचे प्रमुख पदाधिकारी

कार्यकारिणी सदस्य
श्री. उदय लाड - कापूस फेडरेशन व्यवस्थापक (माजी)
श्री. हेमंत डुमरे - व्यवस्थापक
श्री. नीलेश खुटाफले - प्राध्यापक
श्री. अनंत कदम - मुख्याध्यापक (माजी)
श्री. तीर्थराज बोबडे - व्यवसायिक
श्री. रवींद्र मिसाळ - वस्तू व सेवा कर अधिकारी
श्री. प्रवीण धोटे - उद्योजक
श्री. समीर हेजीब - शिक्षणतज्ज्ञ, कलावन्त.
श्री. आशीष केळझरकर - बँक उपव्यवस्थापक
