
नरायणसेवा
हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांना तर सेवा आणि सुश्रुषा मिळत असते; परंतु त्यांच्या सोबत आलेले नातेवाईक, मित्र आणि परिवार यांना मात्र पैशाच्या आणि योग्य सोयीच्या अभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशातच त्यांच्या जेवणाची आबाळ होत असते. हा एक असा मुद्दा आहे की ज्याकडे सहज लक्ष जात नाही. याच दुर्लक्षित मुद्याकडे संस्थेच्या सदस्यांचं लक्ष गेलं आणि त्यातून या उपक्रमाची कल्पना साकारल्या गेली. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ही नारायणसेवा केल्या जाते. यात संस्थेतील सदस्य आणि त्यांचा परिवार मिळून स्वतः स्वयंपाक करून ते अन्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, (मेडिकल) येथे भरती असलेल्या रुग्णांचे नातेवाईक, मित्र किंवा सोबत आलेल्या सहकाऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जाते.
कोविडच्या, ताळेबंदीच्या कठीण काळात, संस्थेच्या सदस्यांनी स्वतः ‘कम्युनिटी किचन’ उभारून गरजूंना अन्नदान तसेच धान्यवाटप करण्यात आले. सेवा पुरविणाऱ्यांच्या हाताला हातभार लावावा असा शुद्ध हेतू या नारायणसेवा उपक्रमाचा आहे.
नारायणसेवा या उपक्रमात संस्थेला, धान्य, भाज्या, किराणा अशा वस्तूंची गरज असते. आपणही या नारायणसेवेत आपलं योगदान देऊ शकता.




गंध आपुलकीचा
आपण करीत असलेले काम हे समाजातील इतर लोकही करीत असताना दिसले की आपण जे काम करीत आहोत ते समाजोपयोगी आहे याचा विश्वास बळावतो.
या विचारानेच श्री सत्य साई बहुद्देशीय संस्था ‘गंध आपुलकीचा’ हा कार्यक्रम दर वर्षी आयोजित करीत असते. यात गरज ओळखून त्या व्यक्तींना साहित्य, अन्न, व रोख निधी सन्मानपूर्वक अर्पण केल्या जाते. या शिवाय अशा गरजूंना मदत करणाऱ्या किंवा त्यांचा सांभाळ करणाऱ्या संस्था किंवा व्यक्ती यांनाही मदतीचा हात देण्यात येतो.
हे दान नसून ही कृतज्ञतेची पावती आहे. आपल्या घासांतून इतरांना घास भरविण्याने असा ‘गंध आपुलकीचा’ दरवळतो, हा विचार या कृतीमागे आहे.




रक्तदान शिबिर
साईसावली वृद्धाश्रमात दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. ‘रक्तदान हेच जीवनदान’ हा संदेश देत आणि याचा मान ठेवत येथे रक्तदान केल्या जाते.
दरवर्षी रक्तदान करणाऱ्यांची संख्या ही वाढत जाते आहे. येथे दान केलेले रक्त विविध रक्तपेढ्यांच्या माध्यमाने गरजूंना उपलब्ध करून देण्यात येते. आश्रमातील वृद्ध तसेच त्यांचे नातेवाईक आणि श्री सत्य साई बहुउद्देशीय संस्थेचे कार्यकर्ते आणि कार्यकारिणी मंडळाचे सदस्य या शिबिरात रक्तदान करतात.




वृक्षारोपण
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरे’ तुकारामांचा हा संदेश घेऊन साईसावली वृद्धाश्रमात नियमित रूपाने निमित्त शोधून काढून वृक्षारोपण केले जाते.
वड, पिंपळ, कडुनिंब, यांसारखे दीर्घायुषी वृक्ष लावण्यात येतात. एकदा ते रोप लावलं की त्या रोपाच संगोपन करण्यासाठी आश्रमातील वृद्धांना जबाबदारी दिली जाते. प्रत्येक वृक्षाचे पालक म्हणून त्यांची नियुक्ती केली जाते. यामुळे त्या रोपाचं वृक्षात रूपांतर होईपर्यंत आपल्याला जगायचे आहे हा भाव आणि इच्छाशक्ती या वृद्धांमध्ये तयार होते.




वैद्यकीय तपासणी शिबिर
साईसावली वृद्धाश्रमात दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. ‘रक्तदान हेच जीवनदान’ हा संदेश देत आणि याचा मान ठेवत येथे रक्तदान केल्या जाते.
दरवर्षी रक्तदान करणाऱ्यांची संख्या ही वाढत जाते आहे. येथे दान केलेले रक्त विविध रक्तपेढ्यांच्या माध्यमाने गरजूंना उपलब्ध करून देण्यात येते. आश्रमातील वृद्ध तसेच त्यांचे नातेवाईक आणि श्री सत्य साई बहुउद्देशीय संस्थेचे कार्यकर्ते आणि कार्यकारिणी मंडळाचे सदस्य या शिबिरात रक्तदान करतात. साईसावली वृद्धाश्रमात दरवर्षी वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात येते. वृद्धाश्रमातील तसेच परिसरातील इतर वृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी व आरोग्य चाचण्या या शिबिरात केल्या जातात. या शिबिराकरिता शासकीय वैद्यकीय रुग्णालय, (मेडिकल) आणि मेयो तसेच काही खाजगी दवाखान्यातील तज्ज्ञ व प्रशिक्षित डॉक्टर येऊन तपासण्या करतात. या शिबिराच्या माध्यमाने केलेल्या चाचण्या तसेच तपासण्यांमध्ये जर कोणाला काही आजार आढळल्यास त्या रुग्णांना तात्काळ औषधे दिली जातात किंवा गरज पडल्यास शल्यचिकित्सा केली जात. याच शिबिरात वृद्धांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना निमंत्रित केले जाते आणि स्वास्थ्य समुपदेशन, मार्गदर्शन केल्या जाते.



