top of page

साईसेवा रुग्णालय
साईसेवा रुग्णालय हा संस्थेचा मुख्य आणि धाडसी प्रकल्प आहे. यात विविध वैद्यकीय चिकित्सापद्धतीवर आधारित सेवा रुग्णांना मोफत आणि शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमाने पुरविल्या जाईल. पन्नास खाटाचे रुग्णालय, वैद्यकीय चाचण्यांची व्यवस्था, रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय आणि स्वास्थ्य समुपदेशन, रुग्णवाहिका, फिरता दवाखाना आणि शल्यचिकित्सा केंद्र हे या प्रकल्पाचे मुख्य भाग असतील. भारतातील आणि भारताबाहेरील लोकांच्या सहभागातून या प्रकल्पाला साकार करण्याच्या निर्धार आम्ही केला आहे. हे काम आपणा सगळ्यांच्या सहकार्यानेच होणार आहे.