top of page

साईछत्र - छात्रावास 

साईछत्र हा संस्थेचा भविष्यातील प्रकल्प आहे. आदिवासी, ग्रामीण तसेच वंचित समाजाच्या मुलांना सांभाळण्यासाठी, त्यांचे संगोपन आणि पालकत्वाची महत्त्वाची जबाबदारी साईछत्र घेणार आहे. 
मुलांचे बालपण टिकवून ठेऊन, आनंदी आणि समाधानी आयुष्य मुलांनी स्वतः घडवावे हा विचार आणि त्या करिता कृती मुलांना पुरवणे हा हेतू मनाशी बाळगून साईछत्र उभारल्या जाईल. 
साईछत्र या प्रकल्पाकरिता इमारत म्हणजेच जीवनोपयोगी मूलभूत सोईंनी सज्ज अशा छात्रावासाची संस्थेची संकल्पना ही आपल्यासारख्या दानशूर पालकांच्या मदतीनेच शक्य होणार आहे.

श्री सत्यसाई बहुद्देशीय संस्था (रजि. नं. ४१/२०१६) 

श्री सत्यसाई बहुद्देशीय संस्था ही एक सामाजिक विकासाकरिता काम करणारी संस्था आहे. देणगी आणि सेवा अशा लोकसहभागातून ही संस्था आपले कार्य करीत आहे. २०१६ साली या संस्थेची स्थापना झाली. ​​

 आपल्या पर्यंत पोहचण्यास आपला इमेल नोंदवा 

धन्यवाद !

© 2024 

bottom of page